S M L
  • आशाताईंच्या भेटीला राज ठाकरे

    Published On: Oct 25, 2011 03:21 PM IST | Updated On: Oct 25, 2011 03:21 PM IST

    25 ऑक्टोबरमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची भेट घेतली. आशा भोसले यांचं नाव नुकतंच गिनिज बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे. स्टुडिओमध्ये सर्वांत जास्त गाणी गाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी राज यांनी आशा भोसले यांची भेट घेतली. गिनिज बुकमध्ये नाव गेल्यानंतर अनेकांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. पण प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारे राज ठाकरे हे पहिलेच आहेत,असं आशाताईंनी यावेळेस सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close