S M L
  • सोपवलेली कामं पूर्ण केली - मुख्यमंत्री

    Published On: Nov 10, 2011 05:27 PM IST | Updated On: Nov 10, 2011 05:27 PM IST

    काँग्रेस पक्षात राज्याच्या मुख्यमंत्री बदलाचे वारे सध्या जोरात वाहतं आहे. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या कामासाठी आपल्याला दिल्लीतून राज्यात पाठवण्यात आलं होतं, ती कामं आपण पूर्ण केली आहेत आतानिर्णय सोनिया गांधींनी घ्यायचा असं विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत तथ्य असल्याचे संकेत खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीला उद्या एक वर्ष पूर्ण होतं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close