S M L
  • कोल्हापुरात पंचगंगा घाटावर दीपोत्सव

    Published On: Nov 10, 2011 01:15 PM IST | Updated On: Nov 10, 2011 01:15 PM IST

    10 नोव्हेंबरत्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटनाच्यावतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. घाटावर विविधरंगी रांगोळ्याही काढण्यात आल्या. पणत्या प्रज्वलीत केल्यानंतर घाटावर फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. बोचर्‍या थंडीमध्ये घाटावर नागरिकांनी हजारो पणत्या लावल्या त्यामुळे पंचगंगा घाटाचा परिसर पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close