S M L
  • चिमुरड्या नानाला हवी नावाची हाक !

    Published On: Nov 14, 2011 03:23 PM IST | Updated On: Nov 14, 2011 03:23 PM IST

    दिनेश केळुसकर, रत्नागिरी14 नोव्हेंबरआई हयात नाही वडीलांचा पत्ता नाही. नाव नाही आणि गाव कुठलं ते पण ठाऊक नाही. सगळेजण त्याला फ़क्त नाना म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानरमारे म्हणून ओळखल्या जाणार्‍या आदिवासी जमातीतल्या 7 वर्षाच्या या चिमुरड्याला विलक्षण ओढ आहे ती शाळेची. पण त्यासाठी त्याला त्याचं नाव हवंय. पाटीवर आई अशी अक्षरं काढायला शिकलेला हा सात वर्षाचा मुलगा... लहानपणीच त्याची आई वारली आणि दोन वर्षापूर्वी आपली झोपडी जाळून बापही परागंदा झाला. या वर्षी पंधरा ऑगस्टला झेंडावंदन पाहण्यासाठी तो आपल्या बक-यांबरोबर खेळत खेळत गावातल्याच शाळेत जाऊन पोहोचला. आणि शिक्षिका सुनिता कविटकर यांनी त्याला वर्गात घेतलं. शिक्षिका सुनीता कविटकर म्हणतात, तो शाळेत यायला लागला तेव्हा बोकडं पण शाळेत यायला लागली. खिडकीतून उड्या मारायला लागली. त्यासाठी आम्ही बघितलं पण ती ऐकेनात. त्याच्याबरोबरच यायला लगली. मग आम्ही त्याला बोकडांसाठी दोन दोर्‍या दिल्या आणि समोर बांधायला सांगितली. आणि त्याला सांगितलं की तू शाळेत ये बोकडं आली तरी आम्ही बघुया काय ते.आवळेगावमधल्या रामकृष्ण सावंत कुटुंबाने त्याचा सांभाळ केला. तिथल्या शेताभातात तो रमतोय. नाव नाही म्हणून सगळेजण त्याला नाना म्हणतात. पण सावंतांपुढे त्याच्या ओळखीचा प्रश्न कायम आहे.रामकृष्ण सावंत म्हणतात, आता प्रश्न असा आहे की ह्या मुलाच्या बाबतीत आम्ही शाळेत त्याला पाठवलंय. बाईंनी आपल्या जबाबदारीवर घेतलं जरी असलं तरी उद्या त्याचं नाव जर नसेल तर अडचणंच आहे. आणि सरकराने त्यासाठी काहीतरी करून नाव दाखल करण्याची परवानगी द्यावी.सुनिता कविटकर म्हणतात, आम्ही ही त्याला नानाच म्हणतो पण त्याच्या वडिलांचं किंवा आडनाव, जात हे काहीच न कळल्यामुळे आम्ही त्याचे रजिस्टरवर नाव ओढ़लेलं नाही. फ़क्त पेन्सिलने मी हजेरी पत्रकावर नव ओढलेलं आहे त्याचं.या नानाला पाहिल्यावर मला आठवते ती कविवर्य नारायण सुर्वे यांची मास्तर तुमचच नाव लिवा ही कविता. तिथे मास्तरांना सांगणारी आई होती मात्र इथे आईही नाही आणि वडिलही नाहीत. तरीही सगळ्या समाजाने पुढे येऊन त्याच्या जीवनाचा पाया रचण्यास सुरुवात केली. सावंत आजींना हा नाना अ'ाये' म्हणतो. म्हणूनच की काय त्याचं पुनर्वसन होईपर्यंत त्याचा सांभाळ करण्याची तयारी या कुटुंबाने दाखवली.ग्रामस्थ ललिता सावंत म्हणतात, आता न्हेतीत तेवा न्हेतीत तवसर सांभाळू व्होय आमका असो न्हान पोरगो टाकतलास खय.?खडूने काय करायचं असतं ..? लिवायचं असतं। नाव आपल्याला काय देतं... फक्त ओळखच नाही... तर स्वप्नही. त्यासाठीच या चिमुरड्याला साथ हवीये त्याच्यावर मायेची पाखर धरणा-या समाजाची.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close