S M L
  • पतंगराव कदम यांची फटकेबाजी

    Published On: Nov 17, 2011 05:48 PM IST | Updated On: Nov 17, 2011 05:48 PM IST

    17 नोव्हेंबरवनमंत्री पतंगराव कदम यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांसाठी पर्वणीच.. कोणत्याही विषयावर प्रश्न विचारा, पतंगराव आपल्या खास शैलीत उत्तरं देणार...असाच प्रत्यय आज पुण्यात आला. वनविभागाच्या आढावा बैठकीनिमित्ताने पत्रकार परिषदेत वनमंत्र्यांची गाडी अशीच वेगवेगळ्या विषयांचे स्टेशन गाठत सुसाट निघाली होती. फॉरेस्टचा कायदा कसा कडक आहे हे सांगताना आपल्यालाही या कायद्याचा फटका बसला हेही त्यांनी सांगून टाकलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज सरकारच्या एक वर्ष झाल्यानिमित्तानं पतंगराव स्टाईलमधलं विश्लेषणही त्यांनी करुन टाकलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close