S M L
  • ...तो डान्स करतो जेसीबी मशीनसोबत !

    Published On: Nov 17, 2011 05:55 PM IST | Updated On: Nov 17, 2011 05:55 PM IST

    17 नोव्हेंबरउत्खनन करणार्‍या यंत्रासोबत एखादा माणूस नाचत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणाल ? कदाचित तुम्हाला हा वेडेपणा वाटेल. ही संकल्पना ऐकायला विचित्र जरी वाटली तरी ती किती भन्नाट आहे हे पाह्यल्यावर अनुभवल्यावरच कळेल. पुण्यातल्या फिल्म ऍंड टेलीविजन इन्सिस्टिट्युटच्या मैदानावर डान्स ड्युएट - बिटविन डान्सर ऍंड एक्सकवेटर हा शो आयोजित करण्यात आला होता. फ्रान्सचा 55 वर्षांचा फिलीप प्रिआसो मशीनला माणसाप्रमाणे आंजारत- गोंजारत नाचत होता. ट्रान्सपोर्ट एक्सप्शनल नावाने ओळखला जाणारा हा नृत्यप्रकार असून एरीक लामी हा ड्रायव्हरचं काम करत होता. डॉमनीक ब्वावा हा डान्स कोरिओग्राफर होता. पुणेकरांनी हा अनोखा डान्स पहायला गर्दी केली होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close