S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • या अधिवेशनात 'लोकपाल' मंजूर होईल - अण्णा हजारे
  • या अधिवेशनात 'लोकपाल' मंजूर होईल - अण्णा हजारे

    Published On: Nov 22, 2011 04:38 PM IST | Updated On: Nov 22, 2011 04:38 PM IST

    22 नोव्हेंबरहिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी आयबीएन- लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी बोलतांना अण्णांनी हिवाळी अधिवेशनात, लोकपाल विधेयक मंजूर होईल अशी आशा व्यक्त केली. तसेच सीबीआय आणि न्यायपालिका लोकपालच्या कार्यकक्षेत आणा, किंवा त्यांच्यासाठी कठोर कायदे करा अशी भूमिका अण्णांनी घेतली आहे. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनात सरकार लोकपाल विधेयक आणणार असल्याची ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अण्णांना दिलीय. पंतप्रधानांनी अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे. या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर झालं पाहिजे अशी मागणी करणारं पत्र अण्णांनी पंतप्रधानाना लिहिलं होतं. त्याला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी अण्णांना पत्र पाठवून उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close