S M L
  • सनी लिऑनला बॉलिवूडची ऑफर ?

    Published On: Nov 29, 2011 04:22 PM IST | Updated On: Nov 29, 2011 04:22 PM IST

    अंतरा चौघुल, मुंबई29 नोव्हेंबर बिग बॉसचं घर नेहमीच चर्चेत राहीलंय ते त्यातील कॉन्ट्रोवर्सीमुळे आणि त्यातील सेलिब्रिटी स्पर्धकांमुळे नव्याने दाखल झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनला बॉलिवूड खुणावतं आहे आणि खास तिच्यासाठी महेश भटही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करत आहे. बिग बॉस सिझन 5 मध्ये सनी लिऑन या हॉलिवूड स्टारची एँट्री हा एक टर्निंगपॉईंट होता. बिग बॉलच्या घरातील सेलिब्रिटींसाठी तर हा बदल नवीन होताच पण प्रेक्षकांसाठीही तो उत्सुकता वाढवणारा ठरला. सनी लिऑनची बिग बॉस घरात एन्ट्री झाली रे झाली तोच तिच्या बॉलिवूडमध्ये ऑफर्सच्या चर्चा जोर धरु लागल्या.. बिग बॉसच्या घरातही ही चर्चा चांगलीच रंगली होती. आता खबर अशी आहे की दिग्दरर्शक महेश भटनी बिग बॉसच्या घराला भेट दिली आणि ते सनी लिऑनवर भलतेच खुश झालेत. महेश आणि मुकेश या भट बंधूंनी बॉलिवूडमध्ये अनेक जणांना चमकवलंय..आणि याची बरीच उदाहरणं आहेत. महेश भट यांची नजर सनीवर पडल्यामुळे तिला आता बॉलिवूडची दारं उघडी झाली आहे. त्याचा ती किती फायदा घेतेय हे लवकरच कळेल..पण तत्पूर्वी बिग बॉस घरातमध्ये तिने बॉलिवूड मध्ये एन्ट्री करण्यासाठी बर्‍यापैकी मेहनत घेतली. बिग बॉसच्या घरातील एन्ट्रीमुळे सनीला जॅकपॉट लागलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close