S M L
  • पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

    Published On: Dec 13, 2011 07:46 AM IST | Updated On: Dec 13, 2011 07:46 AM IST

    13 डिसेंबरआज पुण्याजवळ सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाला अपघात झाल्याने ते वाडेबोलाईजवळ कोसळले आहे. लोहगावहून या विमाने उडाण केले होते. कोसळलेलं हे विमान पूर्णपणे जळून खाक झालं आहे. प्रशिक्षणावेळी हा अपघात झाल्याचं समजतंय. विमानातील दोन्ही पायलटनी पॅराशूटच्या साह्याने उडी घेतली. त्यामुळे पायलट बचावले. अपघातग्रस्त विमान मोकळ्या जागेत कोसळल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close