S M L
  • अति बोलणंच राणेंना नडलं - राज ठाकरे

    Published On: Dec 12, 2011 05:08 PM IST | Updated On: Dec 12, 2011 05:08 PM IST

    12 डिसेंबरनारायण राणे यांनी अति बोलण्यामुळे विनाकारण शत्रुत्व ओढवून घेत आहे. राजकारणात संयम बाळगणे महत्वाचे असते असा सल्ला राज ठाकरे यांनी राणेंना दिला. राज ठाकरे पुण्यात बोलत होते. नगरपालिकेच्या निकालात मनसेने खेडमध्ये आपला झेंडा फडकावला आहे. आज राज्यातील 132 नगरपालिकांचा निकाल जाहीर होत आहे. नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणविभागात दारुण पराभावाला सामोर जावे लागले.राष्ट्रवादीने सर्व 17 च्या 17 जागा जिंकल्या आहे. तर दुसरीकडे मनसेने कोकणात खेडमध्ये नगरपालिकेच्या 9 जागा जिंकत आपला झेंडा फडकावला आहे. याविजयाबद्दल राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणतात, या विजयाबद्दल आम्ही समाधानी आहोत. आणि येत्या निवडणुकीतही मनसे असंच काम करेन आणि जिंकून येईन असा विश्वास व्यक्त केला. तसेच नारायण राणे यांनी अति बोलण्यामुळे विनाकारण शत्रुत्व ओढवून घेत आहे. राजकारणात संयम बाळगणे महत्वाचे असते राजकारणात आरोप प्रत्यारोप होतच असतात पण राणेंनी संयम बाळगणे गरजेचे आहे असा सल्ला राज यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close