S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'लोकपाल'मध्ये सुचवणार दुरुस्त्या - वृंदा करात
  • 'लोकपाल'मध्ये सुचवणार दुरुस्त्या - वृंदा करात

    Published On: Dec 26, 2011 03:07 PM IST | Updated On: Dec 26, 2011 03:07 PM IST

    26 डिसेंबरबहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत लोकपाल विधेयक संसदेत सादर झाले मात्र सरकारी विधेयकाला टीम अण्णांनी नकार दिला. तर दुसरीकडे विरोधीपक्षांनीही आपला विरोध दर्शवत लोकपाल मागे घ्यावा अशी मागणी केली. तर लोक पाल विधेयकात डावे पक्ष सुध्दा दुरुस्त्या सुचवणार आहेत अशी माहिती सीपीएमच्या नेत्या वृंदा करात यांनी आयबीएन-लोकमतला दिली. तसेच अण्णांच्या आंदोलनासाठी सरकारने आझाद मैदानावर परवानगी दिली नाही तसेच एमएमआरडीए मैदानावरही भाड्यात सवलत दिली नाही. मात्र वृंदा करात यांनी संसदेत लोकपालवर चर्चा सुरु असली तर अण्णांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं. वृंदा करात यांची संपादक निखिल वागळे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close