S M L
  • अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने आले रडू

    Published On: Dec 28, 2011 11:07 AM IST | Updated On: Dec 28, 2011 11:07 AM IST

    28 डिसेंबरहे काम एकट्या अण्णा हजारे यांचे नाही तर संपूर्ण टीमचं आहे. मग अण्णांनी उपोषण मागे घ्यावे. किरण बेदी, अरविंद केजरीवाल यांनी उपोषण सुरू ठेवावं, असं स्पष्ट मत मांडलंय राळेगणच्या महिलांनी...अण्णा आमचं दैवत आहेत. त्यांच्या ढासळत्या तब्येतीची आम्हाला काळजी वाटते. त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या महिलांनी केली. त्यासाठी त्यांनी राळेगणच्या यादवबाबालाही साकडं घातलंय. अण्णांबद्दल बोलताना या महिलांना रडू आवरलं नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close