S M L
  • नॅनोला टक्कर देण्यासाठी आली बजाजची आर.ई 60

    Published On: Jan 3, 2012 12:42 PM IST | Updated On: Jan 3, 2012 12:42 PM IST

    03 जानेवारी'हमारा बजाज...' घोष वाक्य गाजवत गेली कित्येक वर्ष दुचाकी आणि तीनचाकी वाहनात आपलं वर्चस्व गाजवणार्‍या बजाज ऑटोने चारचाकी वाहन उत्पादनात उडी घेतली आहे. आणि थेट टक्कर दिली आहे ती टाटाच्या नॅनोला. नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाजने आर.ई.60 (RE 60) ही छोटेखानी कार बाजारात अधिकृतपणे लाँच केली. या कारचा वेग ताशी 70 किलोमीटर इतका आहे. चार जण या कारमध्ये बसू शकतात. आणि विशेष म्हणजे एका लिटरमध्ये 30 किलोमीटर एवढं मायलेज ही कार देणार आहे. आणि राहिली गोष्ट किमंतीची तर या कारची किमंत आहे 1 लाख 20 हजार रुपये..टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी प्रत्येक भारतीयकडे स्वत:ची कार असेलं असं स्वप्न साकार करुन दाखवलं ते नॅनोच्या रुपात. मात्र नॅनोची चर्चा खूप झाली लोकांना तिचं कौतुकही वाटलं पण अपेक्षीत विक्री मात्र होऊ शकली नाही. आता टाटाने आपली सर्व शक्तीपणाला लावून नॅनोची विक्री वाढवली बाजारात नॅनोचे रिपोर्टही सुधारत आहे. पण आता नॅनोला टक्कर देण्यासाठी बजाज ऑटोने शब्द दिल्याप्रमाणे आर.ई 60 लाँच केली आहे. भारतात छोट्या कारच्या दुनियेत अगोदरच स्पर्धा तीव्र झाली आहे आता बजाजची ही छोटीदीदी किती कमाल करते हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close