S M L

धोणीची कॅप्टन्सी ठरली भारतासाठी लकी

15 डिसेंबर अनिल कुंबळे याच्या निवृत्तीनंतर संघाची धुरा सांभाळणारा महेंद्रसिंग धोणी टेस्ट क्रिकेटमध्येही कमालीचा यशस्वी ठरला आहे. धोणीनं आत्तापर्यंत चार टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व केलं. आणि विशेष म्हणजे या चारही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या टेस्ट इतिहासात आजवर अनेक कॅप्टन होऊन गेले. मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनिल गावसकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी आपल्या कॅप्टन्सीनं भारतीय क्रिकेट गाजवलं. पण आता या दिग्गजानंतर भारतीय क्रिके ट इतिहासात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, महेंद्रसिंग धोणीच्या रुपानं. भारतीय वन डे टीमचा यशस्वी ठरलेला हा कॅप्टन आता टेस्टमध्येही भारतासाठी लकी ठरू लागला आहे. अनिल कुंबळे नंतर कॅप्टन्सीची धुरा सांभाळणा-या धोणीनं .भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत चेन्नई टेस्ट तर जिंकलीच. शिवाय दोन टेस्टच्या सीरिजमध्ये आघाडीही घेतली आहे. भारतीय टीमनं मन्सूर अली खान पतौडींच्या नेतृत्वाखाली 40 मॅच खेळल्या त्यात त्यांची विजयाची टक्केवारी होती ती 22.50 इतकी.अजित वाडेकर यांची विजयाची सरासरी आहे 25% तर तब्बल 47 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करणा-या सुनिल गावस्कर यांची टक्केवारी होती फक्त 19.15 इतकी. भारतासाठी सर्वात कमी यशस्वी ठरला तो कपिल देव . पण हे चित्र बदललं मोहोम्मद अझरुद्दीनच्या काळात. अझरुद्दीननं भारतीय टीमची धुरा सांभाळली आणि विजयाची टक्केवारी जवळपास 30 टक्क्यांपर्यंत पोहोचवली. सौरव गांगुलीनं भारताच्या विजयाचा हा चढता आलेख आणखी उंचावला. त्यानं तब्बल 43 % मॅचमध्ये भारताला विजय मिळवून दिला. आणि आता कॅप्टनची ही धुरा सोपवण्यात आली आहे युवा महेंद्रसिंग धोणीकडे. धोणीनं चार मॅचमध्ये कॅप्टनशिप केली आणि या चारही मॅचमध्ये त्यानं भारताला शंभर टक्के दणदणीत विजय मिळवून दिला आणि तेही दादा टीमविरुद्ध. चेन्नई टेस्ट जिंक ल्यामुळे आता भारताला आयसीसी क्रमवारीत दुस-या क्रमांकावर झेप घेण्याची चांगली संधी चालून आली आहे. पण महेंद्रसिंग धोणीला इथंच थांबायचं नाही. त्याचं लक्ष असेल ते यापुढची प्रत्येक टेस्ट मॅच जिंकून देत क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2008 05:37 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2008 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close