S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • परळीमध्ये पुन्हा रंगणार मुंडे विरूद्ध मुंडे वाद
  • परळीमध्ये पुन्हा रंगणार मुंडे विरूद्ध मुंडे वाद

    Published On: Jan 13, 2012 05:31 PM IST | Updated On: Jan 13, 2012 05:31 PM IST

    माधव सावरगावे, बीड.13 जानेवारीबीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असं युद्ध पुन्हा एकदा रंगलंय. पण यावेळी गोपीनाथरावांविरोधात बंड थोपटलेत ते त्यांच्या सख्ख्या भावानं.. म्हणजेच पंडित अण्णा मुंडेंनी. ते राष्ट्रवादीसोबत जाऊन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे ही लढत गोपीनाथ मुंडेंनीही प्रतिष्ठेची बनवली आहे. परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंना.. धनंजय या त्यांच्या पुतण्याने दणका दिला होता. काका पुतण्याच्या या वादानंतर.. आता तिथं भाऊबंदकीला सुरवात झाली. कारण गोपीनाथ मुंडेंचे सख्खे भाऊ आणि धनंजयचे वडील.. पंडित अण्णा मुंडे आता राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता आहे. मुंडेंचे जुने विश्वासू पंडित अण्णा हे राष्ट्रवादीच्या मदतीनं बीड जिल्ही परिषदेचे अध्यक्ष बनू इच्छितात. स्वकीयांनी बंड केल्यामुळे आणि नगर पालिका निवडणुकीत नाक कापलं गेल्यामुळे.. आता गोपीनाथ मुंडेही सरसावले आहेत. भाजपच्या या राष्ट्रीय नेत्याने आपली सर्व शक्ती बीडच्या जिल्हा परिषदेवर केंद्रीत केली. नगर पालिका निवडणुकीत बंड केलेल्या धनंजय मुंडे यांनी अजूनपर्यंत पक्षाने पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं नाही. त्यांना पक्षातून काढलं. तर जिल्हा परिषद निवडणुकीत जास्त नुकसान होईल, अशी पक्षाला भीती आहे. म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close