S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • खा.आनंद परांजपे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
  • खा.आनंद परांजपे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

    Published On: Jan 21, 2012 04:58 PM IST | Updated On: Jan 21, 2012 04:58 PM IST

    21 जानेवारी'तू आमच्यामुळे निवडून आला...तुला चार लोकही ओळखत नाही...तू काय करु शकतो...'अशा शब्दात प्रत्येक वेळा अपमानास्पद वागणूक मिळायची ती कायम मनात खटकत राहीली असं सांगत आनंद परांजपे ढसाढसा रडले. मी कित्येक वेळा उध्दव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यापर्यंत पोहचू शकलो नाही, त्याच्या सल्लागारांमुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला नाही असा आरोपही त्यांनी केला. मी अजून शिवसेना सोडली नाही, बाळासाहेबांवर आपली आजही निष्ठा आहे आणि मी शेवटपर्यंत शिवसैनिकच राहील जर सेनेनं मला बाहेर काढलं तरीसुध्दा मी खासदार म्हणून काम करेल असं परांजपे यांनी स्पष्ट केलं.त्याचबरोबर हे राजकारण आहे त्यामुळे उद्या इथं काय होईल हे मी आज सांगू शकतं नाही असं त्यांनी सांगितलं.कालचा शुक्रवार शिवसेनेसाठी धक्कादायक ठरला. कल्याणचे शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेत अचानक एन्ट्री करत 'राष्ट्रवादीत' प्रवेश केला. आणि एकच खळबळ उडाली. यावेळी शिवसेनेत होतं असलेली अपमानस्पद वागणुकीचा पाढाचं आनंद परांजपे यांनी वाचला. आज आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी आनंद परांजपे यांची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत परांजपे यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्यात, 'तू आमच्यामुळे निवडून आला..तुला चार लोकही ओळखत नाही..तू काय करु शकतो...'' अशा शब्दात प्रत्येक वेळा अपमानास्पद वागणूक मिळायची ती कायम मनात खटकत राहीलं असं सांगत परांजपे ढसाढसा रडले. माझी प्रामाणिक अपेक्षा होती, मी एक साधा शिवसैनिक आहे, स्वर्गीय प्रकाश पराजंपे यांनी शिवसेनेसाठी भरपूर काही केलं त्यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवून धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श ठेवून आपल्या मतदार संघासाठी चांगलं काम करावं अशी प्रामाणिक इच्छा होती पण माझ्यात काही तरी कमीपणा त्यांना वाटला. एवढेच नाहीतर माझ्या भावाच्या लग्नाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती होती तेव्हापासून माझ्याविरोधात चुकीचा गैरसमज पसरत गेला तसेच सेंट्रल हॉल जिथे सर्वपक्षाचे खासदार एकमेकांना भेटतात तिथे राहुल गांधी यांना भेटलो त्यामुळे माझ्याविरोधात संशयाचे वातावरण निर्माण केले गेले असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर शिवसेनं जैतापूर प्रकल्प आणि लोकपाल विधेयकाला घेतलेल्या विरोधावर आक्षेप घेतं पराजंपे यांनी आपलं मतं मांडलं. एकीकडे शिवसैनिक लोडशेडिंगच्या विरोधात महावितरणची कार्यालय फोडली आणि दुसरीकडे जैतापूर प्रकल्पाला विरोध करायचा, कोणताही प्रकल्प येऊ द्या पण आपल्या राज्यात नको तो कर्नाटकमध्ये आला तरी चालेलं अशा विरोधाला विरोध करणे मला योग्य वाटलं आणि तो मी केला. तसेच जेव्हा लोकपाल विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु होती. तर लोकांचा संताप जनआंदोलनातून प्रकट झाला आणि एक सक्षम कायदा आणावा अशी मागणी सगळीकडून होऊ लागली. पण पक्षाने लोकपाल किंवा लोकायुक्त ज्यामुळे भ्रष्टाचाराला चाप बसू शकेल असा विचार केला नाही. त्याला कायम विरोध केला. सद्याची सुव्यवस्था त्यासाठी सक्षम आहे असं समज निर्माण केला आणि त्याला विरोध केला. जर लोकपाल असला असता तर अनेक राजकीय नेते कारागृहात असते असं मतं ही आनंद पराजंपे यांनी व्यक्त केलं. मी आजही शिवसेनाला मानतो, अजून शिवसेना सोडली नाही उद्या जर पक्षांने बाहेर काढले तरी मी खासदार म्हणून लोककल्याणासाठी काम करीत राहीलं असं स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close