S M L
  • निवडणूक आयोगाने आयोगासारखं काम करावं - राज

    Published On: Jan 24, 2012 12:35 PM IST | Updated On: Jan 24, 2012 12:35 PM IST

    24 जानेवारी निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगासारखं काम करावं मी शंका उपस्थित केली होती,मग प्रत्येक वेळेला कोणी माफी मागितली तर त्याला असेच सोडून देणार का ? असा सवाल राज यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला. राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज अनेक विषयांवर आपली मतं मांडली. याचवेळी मुंबईत 13 जुलै झालेल्या बॉम्बस्फोटात सापडलेले आरोपी हे परराज्यातील आहेत ही बाब उघड झाल्यानंतर आपण यापूर्वीच ही शंका उपस्थित केली होती असंही राज यांनी सांगितले.आचारसंहिता भंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाची माफी मागितल्यानंतर आयोगाने क्लीन चीट दिली. आयोगाच्या या भूमिकेवर राज ठाकरे यांनी आक्षेप घेत निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावा खाली काम करते अशी घणाघाती टीका राज यांनी केली. राज यांच्या विधानाला उत्तर देत आयोगाने राज यांना समज दिली. जर पुन्हा एकदा राज यांनी टीका केली तर पक्षावर कारवाई केला जाईल असा इशाराचा आयोगाने यातून दिला. आज राज यांनी पत्रकार परिषद घेऊन, आयोगाला प्रश्न विचारायचे नाही का ? उद्या आम्ही आचारसंहिता भंग केली तर आयोग आम्हाला सोडेल का ? असा सवाल उपस्थित केला. मी निवडणूक आयोगाचे स्थान काय आहे हे मी जाणतो. पण प्रत्येक वेळी जर चुकाकरुन माफी मागितली तर आयोग सर्वांना माफ करणार का ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.दरम्यान शिवसेनेनं ठाण्यात जे फोडाफोडाची राजकारण सुरू केलंय ते बाळासाहेब ठाकरेंना आवडलेलं नाही, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. दरम्यान शिवसेनेनं ठाण्यात जे फोडाफोडाची राजकारण सुरू केलंय ते बाळासाहेब ठाकरेंना आवडलेलं नाही, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला. कालच बाळासाहेबांनी शरद पवार हे आपले चांगले मित्र आहे असं म्हटलं होतं याला पवारांनीही 'ही दोस्ती तुटायची नाय' असं सांगत बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. पण राज यांनी आपला अनूभवाच्या बळावर तर्क करत बाळासाहेबांना ठाण्यातील फोडाफोडी आवडली नाही हे त्यांच्या मैत्रीपूर्ण विधानावरुन स्पष्ट होतंय असं राज ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close