S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बस अपघातात मृत पावलेल्या श्वेतानं केलं नेत्रदान
  • बस अपघातात मृत पावलेल्या श्वेतानं केलं नेत्रदान

    Published On: Jan 25, 2012 02:50 PM IST | Updated On: Jan 25, 2012 02:50 PM IST

    25 जानेवारीपुण्यात झालेल्या बस अपघातात 28 वर्षाच्या श्‍वेता ओसवालला जीव गमवावा लागला. पण जगाचा निरोप घेण्याआधी तिनं नेत्रदानाची इच्छा बोलून दाखवली. गंभीर जखमी असलेल्या श्वेताला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण श्‍वेताला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. श्वेताचा मृत्यू ओढवला पण तिच्या कुटुंबीयांनी यातून सावरून तत्काळ तिचं नेत्रदान केलं. अपघाती मृत्यूपूर्वी नेत्रदानाचा निर्णय घेऊन श्वेतानं सगळ्यांसाठी एक आदर्शच घालून दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close