S M L
  • रोजच्याप्रमाणे बसची वाट पाहत थांबले अन्...

    Published On: Jan 25, 2012 02:39 PM IST | Updated On: Jan 25, 2012 02:39 PM IST

    25 जानेवारीपुण्यात झालेल्या बस अपघातात अंकुश तिकोणे या 46 वर्षांच्या कुरिअर कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर दुःखाची कुर्‍हाड कोसळली आहे. अंकुश तिकोणे हे या थरार नाट्याचे पहिले बळी...46 वर्षांचे अंकुश तेज कुरिअर कंपनीत काम करायचे. रोज पुणे-बारामती बसने ते अपडाऊन करायचे, रोजच्या प्रमाणे बारामतीला जाण्यासाठी अंकुश यांनी स्वारगेट गाठलं आणि तिथेच काळाने त्यांच्यांवर झडप घातली. 23 वर्षांचा रामललित शुक्लाही संतोष मानेचा बळी ठरला. युपीतून आलेला रामललित पुण्यात मजुरी करायचा. नातेवाईकाला निरोप द्यायला गेलेला रामललीत घरी परतलाच नाही. माथेफिरु बस ड्रायव्हर संतोष मानेच्या या बेदरकारपणाने पूजा पाटील, पिंकेश खंडेलवाल, मिलींद गायकवाड,अक्षय पिसे, शुभांगी मोरे, श्वेता ओसवाल यांचाही बळी घेतला. संतोष मानेची ही भरधाव बस या सगळ्याच्या घरात शोककळा पसरवून गेली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close