S M L
  • बंडखोरीची मला चिंता नाही - राज ठाकरे

    Published On: Jan 27, 2012 05:49 PM IST | Updated On: Jan 27, 2012 05:49 PM IST

    27 जानेवारीमी या पक्षात जाईल त्या पक्षात जाईल अस करण्यार्‍या बंडखोरांची मला चिंता नाही, मी काही दहा पक्ष चालवत नाही असंही राज यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले. प्रभादेवी येथे रविंद्र नाट्य मंदिरात मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा राज यांनी घेतला. यावेळी ज्या उमेदवारांना उमेवारी मिळाली नाही तर नाराज होऊ नका एक अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागतो असंही राज ठाकरेंनी म्हणाले. त्याचबरोबर मनसेची उमेदवारी यादी उद्या किंवा परवा जाहीर होईल असंही राज यांनी जाहीर केलं.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राज यांनी नवा पायंडा पाडत इच्छुक उमेदवाराच्या परीक्षा घेतल्या. राज्यभरात राज यांनी स्वत:जाऊन मुलाखती घेतल्या. आता प्रतिक्षा आणि उत्सुकता होती ती निकालाची. आज झालेल्या मेळाव्यात राज यांनी उद्या किंवा परवा यांची यादी जाहीर करणार असं जाहीर केलं. ही संपूर्ण प्रक्रिया मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि मी याचा साक्षीदार आहे. उद्या जर कोणत्याही उमेदवाराला किंवा त्याच्या बहिणीला, आईला, भावाला उमेदवारी मिळाली नाही तर मी त्यांची माफी मागतो. त्यांची दिलगिरी व्यकतो करतो आपले प्रेम आपल्या पक्षावर असंच राहु द्या, यावेळी राज यांनी हात जोडले. तसेच मला उमेदवारी भेटली नाही तर मी या पक्षात जाईल त्या पक्षात जाईल अस करण्यार्‍या बंडखोरांची मला चिंता नाही, मी काही दहा पक्ष चालवत नाही असंही राज यांनी बंडखोरांना ठणकावून सांगितले. त्याच बरोबर राज्यभरात घेण्यात आलेल्या पक्षांच्या मुलाखतीत एका पेक्षा एक भेटलेल्या कार्यकर्त्यांचे किस्से सांगितले. ज्या वेळेस मी उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो तेव्हा बाहेर असलेल्या इच्छुक उमेदवाराला एका पत्रकार बांधवाने प्रश्न विचारला की, जर उमेदवारी भेटली नाही तर काय करणार ? यावर कार्यकर्ता म्हणतो, रात्री भरपूर दारु पिणार....वाईट वाटलं म्हणून फूल टाईट होणार..आणि सकाळी परत पक्षाच्या कामाला लागणार...!! राज यांच्या या किस्स्याने सभागृहात एकच हश्श्या पिकल्या टाळ्या आणि शिट्यांनी नाट्यगृह कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले. यावर राज यांनी मला त्याची भावना आवडली पण असा काही आदर्श घडवू नका असं ही बजावून सांगितले.इतर बातम्या उमेदवार निवडीचे राज यांचे मजेदार किस्से

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close