S M L

मालिकांमधल्या बालकलाकारांचा मुद्दा ऐरणीवर

16 डिसेंबर, मुंबई बाल कलाकारांना घेऊन मालिका बनवणा-या सर्व मालिकांच्या निर्मात्यांना राज्याच्या कामगार विभागाने बालकामगार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यान्वये नोटिसा बजावल्या आहेत. मालिकांमधून काम करताना या मुलांवर कामाचा वाढणारा अतिरिक्त ताण, मुलांचं बालपण हरवू नये त्यासाठी कामगार मंत्रालयानं नोटिसा दिल्या आहेत. कामाचा ताण, 12 - 12 तासांच्या शिफ्टस यात मुलांचं बालपण हरवू नये म्हणून बालकामगार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1986 नुसार या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक टीआरपी असणा-या ' बालिकावधू ', ' छोटे उस्ताद ', ' उतरन ', ' छोटा पॅकेट बडा धमका, ' आणि ' चक्क दे बच्चे ' या बाल कलाकारांवर अवलंबून असणा-या मालिकांचं धाबं दणाणलं आहे. बालकामगार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1986 अन्वये अनेक उद्योग आणि व्यवसायांमध्ये बालकामगारांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. जी व्यक्ती वयाच्या 14 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा व्यक्तीला बालक समाजावं, असं कायदा सांगतो. या कायद्यामध्ये शेड्युल ए आणि शेड्युल बी असं उद्योग आणि व्यवसायांचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नाटक, सिनेमांचा या कायद्यात आंतर्भाव करण्यात आलेला नाही. पण नाटक, सिनेमा आदी कलात्मक व्यवसायांमध्ये बालकांमधील कलागुणांना वाव मिळावा हे कायदा करण्यामागील कारण जाऊन आता केवळ व्यावसायिक दृष्टिकोन दिसायला लागला आहे. कोणत्याही मालिकांचं शुटिंग हे 8 ते 12 तासांच्या शिफ्टमध्ये चालतं. त्यामुळे बालकलाकारांनाही साधारणपणे त्याच शिफ्टमध्ये काम करावं लागतं, असं सूत्रांकडून कळलं आहे. या बालकरांना सिरिअल तसंच मालिकांमधून काम करण्यासाठी त्यांच्या शाळांमधून विशेष सूट देण्यात आलेली असते. त्यात पालकांचा आपल्या पाल्याचं करिअर घडत असल्याचा चुकीचा दृष्टिकोन यांसारखी कारणं कामगार विभागाच्या लक्षात आली आहेत. त्यामुळे कामगार विभागाने मालिकांच्या निर्मात्यांना नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्याचे नवीन कामगार मंत्री नवाब म्लिक सांगतात, "मी महाराष्ट्राचं कामगार मंत्रालय हातात घेतल्यावर लगेचच मालिकांमधून काम करणा-या बालकलाकारांना काही नियम असावेत असं आमच्याकडे आलेल्या तक्रारींवरून वाटू लागलं आहे. निर्मात्यांचा आणि पालकांचा व्यावसायिक दृष्टिकोन लक्षात येताच आम्ही मालिकांच्या निर्मात्यांना नोटिसा बाजावल्या आहेत. बालकलाकरांना घेऊन कोणतंही काम करणा-या निर्मात्यांना वेळंचं बंधन असावं, मुलांचं शिक्षण तसंच त्यांचं बालपण यावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही या नोटीसा बाजावल्या आहेत. या मालिका बंद करण्यामागचा आमचा कसलाच हेतू नाहीये. कामगार मंत्रालयाच्या निर्णयावर ' श्वास ' फेम अश्विन चितळेची आई पूनम चितळे यांचं असं म्हणणं आहे - " कामगार मंत्रालयाच्या निर्णयापेक्षा पालकांची यात मोठी जबाबदारी आहे. आपल्या मुलाला कंटाळा आला, आहे हे पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तसं प्रॉडक्शन हाऊसेसला सांगितल्यावर ते मुलांना काम करायला देत नाही. " पूनम चितळे यांनी हे स्वानुभवावरून सांगितलं आहे. कायद्यानुसार ज्या व्यवसाय उद्योगांना बालकामगार प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1986 अन्वये सूट देण्यात आली आहे, त्यानुसार साडेचार तासांपेक्षा या बालकामगारच काय पण बालकलाकारांकडूनही काम करवून घेता येत नाही. तीन तासांनंतर या बालकामगारांना एका तासाची विश्रांती देणं क्रमप्राप्त आहे. तसंच सगळ्या बालकलाकारांना आठवड्यात एका दिवसाची सुट्टी देणं आवश्यक आहे. बालकलाकारांचं बालपण हरवणार नाही, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही याचं भान व्यावसायीकानं बाळगणं आवश्यक आहे. यासाठीही निर्मात्यांना नोटिसा बजावल्याचं कळलं आहे. पण काही प्रॉडक्शन हाऊसेसना नोटिसा मिळालेल्या नाहीयेत. बॅकस्टेजला नेमकं काय चालतं, तिथलं वातावरण कसं असतं, कामाचे तास-स्पर्धा आणि त्यातून येणारे ताण-तणाव याचा सामना कसा करायचा याबाबत मुलांना योग्य कौन्सिलिंग केलं जातं का, असेही अनेक प्रश्न या निमित्तानं चर्चेत आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 06:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 06:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close