S M L
  • 'पक्ष असो कोणताही पण 'अपना सपना मनी मनी !'

    Published On: Feb 9, 2012 12:57 PM IST | Updated On: Feb 9, 2012 12:57 PM IST

    अलका धुपकर, मुंबई09 फेब्रुवारीअनेक महत्वाच्या पक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. एकीकडे स्टार प्रचारक हे पक्षाच्या प्रमुख उमेदवारांसाठी किल्ला लढवतायत तर दुसरीकडे प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांचा घरोघरी- गल्लोगल्ली प्रचारही सुरु झाला आहे. प्रत्येक मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होत आहे. त्यामुळे आपल्या प्रचारात गर्दी खेचण्यासाठी प्रचारकच विकत आणले जात आहेत. या गर्दीचे दर आहेत 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत..मतदानाला दिवस उरलेयत फक्त आठ...आणि उमेदवारासाठी निवडून येण्याआधीची कसोटी म्हणजे प्रचाराला जमवायची गर्दी..उमेदवारांच्या प्रचाररॅलीचा हा धडाका सोडून आम्ही मोर्चा वळवला तो गर्दीकडे.....कुठून येते ही गर्दी आणि कशासाठी येतात हे ? भेटलं त्या पक्षात जातो, कारण महिन्याचा तीन हजार पगार परवडत नाही त्यामुळे प्रचारात झेंडा फिरवायचा, घोषणा दिल्या की दिवसाकाठी 100 रुपये मिळतात असं सांगणारी मंडळी आम्हाला भेटली. केवळ एकाच पक्षाचा नव्हे तर सर्वपक्षीय प्रचार करणारे महाभागही आम्हाला भेटले. आणि कमी मोबदला मिळाला म्हणून बहिष्कार टाकणारेही भेटले आहे.प्रचार किती झोकात चाललाय, हे ठरवण्याचा मापदंड असतो तो प्रचाराला जमलेली गर्दी...एकेकाळी प्रचारात वापरले जाणारे नवनवे प्रकार आणि उमेदवाराचा व्यक्तीगत करिष्मा यामुळे प्रचाराला तोबा गर्दी व्हायची...आताचा प्रचार मात्र आहे पेड क्राऊड मॅनेजमेंट.. हा विकतचा प्रचार उमेदवारांना तारणार का माहित नाही. पण प्रचारातून निर्माण होणार्‍या या रोजगाराची आणि पेड कॅम्पेनर्सची निवडणूक आयोग दखल घेणार का? हा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close