S M L
  • मी बाळासाहेबांच्या सेनेसोबत - राज

    Published On: Feb 15, 2012 05:16 PM IST | Updated On: Feb 15, 2012 05:16 PM IST

    14 फेब्रुवारीमी लहानपणापासून बाळासाहेबांसोबत राहीलो, सोबत फिरलो, त्यांच्या सभा पाहिल्यात म्हणून त्यांचा प्रभाव माझ्यावर राहणे साहजिकच आहे. मी आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहे. बाळासाहेबांनी बोलावले तर मी भेटायलाही जाईन असा भावनिक गौफ्यस्फोट राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत केला. तसेच मला बाळासाहेबांवर पुर्ण विश्वास आहे पण उध्दव ठाकरेंवर माझा विश्वास नाही ते बोलता एक सांगता ऐक. याबद्दल आज कोणत्याही शिवसैनिकाला विचारु शकता त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा टाकणार नाही असंही राज यांनी ठणाकावून सांगितले.कालचा सोमवार हा ठाकरे परिवारासाठी विशेष होता. राज ठाकरे यांनी जांबोरी मैदानावर सभा घेऊन मी बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन असं भावनिक जाहीर केलं. बाळासाहेबांवर माझी पूर्ण निष्ठा आहे. पण उध्दव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास नाही मी त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा पुढे येणार नाही. असं ठणकावून सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांची आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विशेष मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राज यांच्या जाण्याचे दुख आहे असं बाळासाहेबांनी सांगितले होते. बाळासाहेबांचे विधान पूर्ण करत काल राज यांनी बाळासाहेबांना इच्छा व्यक्त केली. आज राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. यावेळी राज यांनी बाळासाहेबांनी बोलावले तर मी भेटायला जाईल, मी आजही त्यांच्या शिवसेनेसोबत आहे असा गौप्यस्फोट केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close