S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुसर्‍याचा प्रचार केला म्हणून मनसेच्या उमेदवाराने केला खून
  • दुसर्‍याचा प्रचार केला म्हणून मनसेच्या उमेदवाराने केला खून

    Published On: Feb 20, 2012 05:01 PM IST | Updated On: Feb 20, 2012 05:01 PM IST

    20 फेब्रुवारीनिवडणुकीनंतर दुस-याचा प्रचार का केला म्हणून एका मनसेच्या उमेदवारानंच राजकीय वैमनस्यातून खून केल्याची घटना घडली. नागपूरच्या वकीलपेठ भागात ही दुदैर्वी घडली आहे. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने चिडलेल्या मनसेच्या पराभूत उमेदवार संजय बारईने आपल्या सहकार्‍यांना हाताशी धरून केशव आकरे यांचा खून केल्याचं उघड झालं आहे. घरासमोरच दगडाने ठेचून केशव आकरे यांचा खून करण्यात आला आहे.महापालिका निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस झाले नाहीत तोच निवडणुकीत हरल्याचा बदला घेण्याचे प्रकार जागो जागी घडत आहेत. नागपूरच्या वकील पेठेतून निवडणूक लढवणार्‍या संजय बारईला महापालिकेची पायरी चढता आली नाही, तर त्यानं याचा राग शेजारी राहणार्‍या केशव आकरेवर काढला. केशवनं या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. पोलिसांनी याप्रकरणात आठ जणांना अटक केली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांमधील वैरही तितकंच जहाल असतं. संजय बारईला या निवडणुकीत 1500 मतं पडली. या निवडणुकीत शेजार्‍याने आपल्याला मदत केली नाही, त्या रागातून संजयने हा खून केला. भाजपनं याचा निषेध केला आहे. नागपूरमध्ये निवडणुकीपूर्वी हाणामारीच्या घटना नव्या नाहीत. पण निवडणूक झाल्यावर एखाद्याची हत्या होणं ही घटना बहुदा नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close