S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • हातांनी साथ सोडली पण जिद्दीने लढणारा 'कृष्ण'!
  • हातांनी साथ सोडली पण जिद्दीने लढणारा 'कृष्ण'!

    Published On: Mar 1, 2012 02:25 PM IST | Updated On: Mar 1, 2012 02:25 PM IST

    मच्छिंद्र टिंगरे, बारामती01 मार्चनियतीनं काही हातचं राखून ठेवलेलं उणेपण त्यानं झुगारून दिलं आहे. आता त्याची जिद्द आहे, ती इलेक्ट्रीकल इंजीनिअर होण्याची..त्यासाठीच दोन्ही हात नसतानाही जिद्दीनं तो दहावीची परीक्षा देतोय. आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. त्याची परिक्षेची तयारीही जोरात झाली आहे आणि त्याला जबरदस्त खात्री आहे की इंजीनिअर होण्याच्या स्वप्नातल्या त्याचा या पहिल्या टप्प्याला शानदार यश मिळणार आहे. कारण या ध्येयवेड्या मुलाचीच ही आजपासून त्याची दहावीची परीक्षा सुरु होतेय.बारामतीतल्या कर्‍हेवागजचा हा कृष्णा...कुचेकरांचा कृष्णा... आणि ही त्याची शिकण्याची जबरदस्त जिद्द..! अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयातून कृष्णा यंदा 10 वीची परीक्षा देतोय. जन्मत:च त्याला दोन्ही हात नाहीत, पण त्याच्या लढवय्या स्वभावाने त्याच्या पायांना हजारो हातांचं बळ दिलंय.झाडलोटीची काम करणारी आई, वॉचमन वडील आणि हे छोटसं खोपट...कृष्णाची ही संपत्ती ! स्वप्नांचं आकाश व्यापण्यासाठी त्याला गरज आहे ती समाजाच्या मदतीची.. आतापर्यंतचे सगळे पेपर त्यानं पायानं लिहिले. दहावीचेही लिहिणार होता. पण वेळ आणि अचूकता साधण्यासाठी लेखनिक घेणार आहे. घरी आई-वडील, शाळेत जीवाभावाचं मित्र. कृष्णाला सगळी मदत करतात. पण निसर्गानं दिलेले हे उणेपण बेदरकार झुगारून देत कर्‍हेवागजच्या या जिद्दी मुलाला इलेक्ट्रिक इंजीनिअर व्हायचंय आणि ही अंगभूत उर्मीचं त्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close