S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कृपांवर कारवाईसाठी काँग्रेसची टाळाटाळ - राज ठाकरे
  • कृपांवर कारवाईसाठी काँग्रेसची टाळाटाळ - राज ठाकरे

    Published On: Mar 2, 2012 02:58 PM IST | Updated On: Mar 2, 2012 02:58 PM IST

    02 मार्चकृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरण हे हिमनगाचे टोक आहे, कृपांवर कारवाई झाली तर फटाक्याची माळचं लागले पण अशा एक-एक फटाक्याला काँग्रेस सरकार आवर घालत आहे. हे सर्व जाणूनबुजून घडत आहे. कारवाईसाठी उशीर होत असेल तर सरकारचीच चौकशी करावी असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसेच कोर्टाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही राज यांनी केली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंह यांच्यावर गुन्हे दाखल झाले तसेच सुप्रीम कोर्टानेही कृपांची याचिका फेटाळून लावली आहे. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या निवास्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेतली. कृपांच्या अवकृपेचा समाचार घेत परप्रांतीयांच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला. युपीमधून इथं यायचं राजकारण करायचं आणि ऐवढी मोठी बेनामी संपत्ती गोळा करायची यामुळे यांनी राजकीय वातावरण गढुळ केलं आहे. याच्यासारख्या अबू आझमी आणि युपीच्या नेत्यांची चौकशी करावी अशी मागणी राज यांनी केली. तसेच या नेत्यांना मोठ करण्यास आपलेच मराठी नेते जबाबदार आहे त्यांनी दिल्लीत आपली पत राखण्यासाठी यांना मोठं केलं ही शर्मेची बाब आहे. कृपांसह त्यांच्या नातेवाईकांची पण चौकशी केली पाहिजे पण कृपांवर मुद्दामहुन उशीर केला जात आहे. कारण कृपांवर कारवाई केली तर फटाक्याची माळ लागेल म्हणून अशा एका-एकाला काँग्रेस आवर घालत आहे. याबाबत कोर्टाने आता कठोर कारवाई करत सरकारची पण चौकशी करावी अशी मागणी राज यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close