S M L

सुरक्षा यंत्रणा गाफील होत्या - रतन टाटा

16 डिसेंबर, मुंबई ' ताज ' च्या सुरक्षेसाठी आपण आता खासगी सुरक्षा संस्थांची मदत घेणार आहोत. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी सुरक्षा यंत्रणा गाफील होत्या, असा आरोप टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केलाय. त्यांनी मुंबईत झालेल्या लिडरशिप आणि ग्लोबलायझेशन समिटमध्ये ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या पाहणीचा संपूर्ण अहवाल त्यांनी यावेळी सादर केला. 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्यावेळी मुंबई पोलीस आणि सुरक्षा एजन्सी दक्ष नव्हत्या, असंही त्यांनी बोलून दाखवलं. आता कर्मचार्‍यांच्या आणि स्थावर संपत्तीच्या सुरक्षेबाबत टाटा ग्रुप स्वत: लक्ष पुरवेल,असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्थेत फक्त भांडवलाची कमतरता आहे. भांडवलाची ही कमतरता दूर झाली तर अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असंही रतन टाटा यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 12:14 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 12:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close