S M L
  • पुणे अग्निशमन दलात 6 फायर बाईक्स दाखल

    Published On: Mar 24, 2012 11:56 AM IST | Updated On: Mar 24, 2012 11:56 AM IST

    गोपाल मोटघरे, पुणे24 मार्चपुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात पुरेसे पाण्याचे टँकर नसल्याची ओरड नेहमीच होते. पण आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय. नव्या कोर्‍या सहा फायर बाईक्सचा ताफा अग्निशमन दलात सामील झाला आहेत. अरूंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडीमुळे आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर पोहोचण्यास जास्त वेळ लागतो. अशा वेळी या बाईक्स उपयोगी ठरणार आहेत. या फायर बाईक्समुळे अग्निशमन दल आणखी कार्यक्षम आणि चपळ होणार अशी आशा आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close