S M L
  • अहमदनगरमध्ये 'पेट्रोलच्या विहिरी' !

    Published On: Mar 28, 2012 02:29 PM IST | Updated On: Mar 28, 2012 02:29 PM IST

    साहेबराव कोकणे, अहमदनगर28 मार्चअहमदनगरजवळ असलेल्या अकोळनेर गावातले लोक सध्या एका विचित्र समस्येनं ग्रासले आहेत. गावातल्या विहिरींमध्ये पाण्याऐवजी पेट्रोल येतंय. त्यामुळे शेतकर्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय.अकोळनेर गावातल्या विहिरींमध्ये चक्क पाणी नाही पेट्रोल येतंय. याचं कारण आहे जवळच असलेले पेट्रोलचे साठे.. या साठ्यांमधून पेट्रोलची गळती होत असल्याचा गावकर्‍यांना संशय आहे.गेल्या 4 वर्षांपासून ही समस्या असल्याचे गावकरी सांगतात. जमिनीखाली पेट्रोल झिरपत असल्यामुळे जमिनी नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. एवढंच नाही तर परिसरातल्या लोकांना त्वचेचही आजारही होत आहेत. या समस्येची तक्रार गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडेही केलीय. नगरपासून अकोळनेर फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. पण गावकर्‍यांची समस्या सोडवण्यासाठी यायला प्रशासनाला 4 वर्षांहून जास्त काळ लागतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close