S M L
  • नक्षलवाद्यांच्या निशान्यावर सर्वसमान !

    Published On: Mar 30, 2012 03:16 PM IST | Updated On: Mar 30, 2012 03:16 PM IST

    अलका धुपकर, भामरागड30 मार्चगडचिरोली जिल्ह्यातला पूर्वेचा तालुका भामरागड. नक्षलवाद्यांनी या तालुक्यात अनेक वर्ष आपलं बस्तान बसवलंय. छत्तीसगडची सीमा, दुर्गम भाग आणि दहशत या जोरावर दहशतवाद इथं कसा फोफावलाय. पण, भामरागड तालुका पंचायत समितीच्या अध्यक्षांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून नक्षलवाद्यांनी ठार केलं, आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया किती धोकायदायक बनल्यात ते स्पष्ट झालंय.पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना 28 जानेवारीला बहादूरशहा आलमची नक्षलवाद्यांनी हत्या केली. त्याआधी बहादूरशहा आपल्या टार्गेटवर असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. शेवटच्या एसटीमध्ये यांच्या नावाची पर्ची टाकलेली असायची. इतकचं नाही तर घरात घुसून नक्षलवाद्यांनी त्याला दम भरला होता. नक्षलवाद्यांनी आदिवासी युवकाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह सायकलवरुन न्यायची वेळ नातलगांवर आली, कारण नक्षलवाद्यांची इतकी दहशत की पोलीस स्पॉट पंचनामा करण्यासाठी गावात आलेच नाहीत.शेवंता आलम असो किंवा गावागावात दबक्या आवाजात आपली व्यथा मांडणारे आदिवासी असोत, आपला माणूस कायमचाच या जगातून गेला एवढंचं ते सांगतात. नक्षलवाद्यांविरोधात आवाज काढायची हिंमतही ते करु शकत नाही. ही दहशत पाहिल्यावर नक्षलवाद्यांबद्दल आदिवासींना सहानूभूती वाटते, असं कसं म्हणायचं हाच प्रश्न मनात येतो.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close