S M L
  • राम कदम यांच्याशी बातचीत

    Published On: Apr 10, 2012 04:34 PM IST | Updated On: Apr 10, 2012 04:34 PM IST

    10 एप्रिलराजावाडी हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा नसल्याने ते 'भिकारवाडी हॉस्पिटल' आहे त्यामुळे तोडफोड आंदोलन करणारे मनसेचे आमदार राम कदम यांना हे आंदोलन चांगलेच महागात पडले. हॉस्पिटलच्या आवारात गोंधळ घातल्याप्रकरणी राम कदम यांच्याविरोधात कलम 107 आणि 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदेलनासाठी गर्दी केली. हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधांसाठीच्या आंदोलनाला मात्र एखाद्या उत्सवाचं स्वरुप आलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठमोठ्याने राम कदम आणि मनसेच्या नावाने घोषणाबाजी केली त्यामुळे रुग्णांना त्याचा त्रास झाला. इतकचं नाही तर राम कदम हे आपल्या जागव्हार या आलिशान गाडीतून हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. याचप्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये राम कदम यांच्याविरोधात कलम 107 आणि 117 नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे. मात्र राम कदम यांनी हे आंदोलन लोकांच्या भल्यासाठी केले होते जे फटाके फोडले ते सरकारचे कान उघ़डे करण्यासाठी फोडले असा युक्तीवाद केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close