S M L
  • कोलंबिया विद्यापीठात महामानवाचा गौरव

    Published On: Apr 14, 2012 11:39 AM IST | Updated On: Apr 14, 2012 11:39 AM IST

    14 एप्रिलभारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गेल्याच वर्षी कोलंबिया विद्यापीठाने गौरव केला. विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील शंभर विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर बाबासाहेबांची निवड झाली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. गेल्या वर्षी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आगळा वेगळा सन्मान केला. विद्यापीठाने जगभरातल्या 100 विद्वानांची यादी केली आणि या यादीत पहिलं नाव होतं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं... विशेष म्हणजे या यादीत ते एकमेव भारतीय नाव आहे. त्यानंतर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँण्ड पब्लिक अफेअरच्या हॉलमध्ये बाबासाहेबांचं पेंटिंग मोठ्या दिमाखात लावण्यात आलं. याआधी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील राष्ट्रांच्या राज्यघटना आणि कायद्याच्या अभ्यासासाठी बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन केलं. या ठिकाणी बाबासाहेबांचं शिल्प आणि त्यांच्या कामाचा गौरव करणारं साहित्यही ठेवण्यात आलं आहे. बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले ते 1913 मध्ये. त्यासाठी त्यांना बडोद्याच्या महाराजांकडून स्कॉलरशिप मिळाली होती. 1915साली त्यांनी एमएची पदवी मिळवली. पुढे 1927 मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी पीएचडी घेतली.कोलंबिया विद्यापीठात शिकताना आयुष्यात आपल्याला पहिल्यांदाच सामाजिक समतेचा अनुभव आला असं बाबासाहेबांनी 1930 साली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. पुढे 1952 मध्ये आंबेडकरांना सामाजिक योगदानाबद्दल सन्माननीय डॉक्टरेट पद्वी बहाल करण्यात आली. जगभरातील राज्यघटना अभ्यासण्यासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळणं हे आजही महत्वाचं मानलं जातं. त्याच पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा विद्यापीठाने केलेला सन्मान भारतासाठी अभिमान ठरला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close