S M L
  • मुंबईची 'लाईफलाईन' स्लाईनवर !

    Published On: Apr 18, 2012 05:15 PM IST | Updated On: Apr 18, 2012 05:15 PM IST

    18 एप्रिलमुंबईतल्या मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर असलेल्या सिग्नल पॅनलला मध्यरात्री आग लागली. सिग्नल यंत्रणाच कोलमडल्यामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दीपक रोज सकाळी 7.48 ची वाशिंद लोकल पकडून मुंबई सीएसटीला येतात. पण बुधवारी सकाळी ते वाशिंद स्टेशनला पोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला..दीपकसारखंच मुंबईतल्या 25 लाख लोकांचे हाल झाले. लोकल बंद झाली की मुंबई ठप्प होते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान मध्यरात्री लोकलच्या सिग्नल केबिनला आग लागली. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली खरी.. पण त्यात सिग्नल यंत्रणा जळून भस्मसात झाली. त्यामुळे मध्य आणि हार्बर लाईनची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.रोज गर्दीने ओसंडून वाहत असलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आज मात्र शुकशुकाट होता. खूप उशिरानं गाड्यांची ये-जा सुरु झाली. पण तीही तुरळकच.ठाणे, कल्याण ते थेट कसारापर्यंत हेच दृश्य दिसत होतं. एवढंच नाही पुणे आणि नाशिकहून येणार्‍या सिंहगड, प्रगती, गोदावरी आणि राज्यराणी या चार एक्सप्रेस गाड्ायही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे या दोन शहरांतून अप-डाऊन करणार्‍या प्रवाशांच्याही नाकी नऊ आले. लोकल रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षाही देता आली नाही. अनेक जणं उशिरा पोचले. त्यामुळे आता मुंबई विद्यापीठ फेरपरीक्षा घेण्याचा विचार करतंय. रेल्वेच्या खोळंब्यामुळे डब्बेवाल्यांनाही सेवा बंद ठेवावी लागली. त्यामुळे 30 हजार मुंबईकरांना आज डबे पोचू शकले नाही.गेली कित्येक वर्ष मुंबईची लोकल ही सामान्य मुंबईकरांना त्याच्या इच्छित स्थळी कमी वेळेत, कमी पैशात आणि सुरक्षित पोचवण्याचं काम चोख बजावतेय. पण ओव्हरहेड वायर तुटणे, मेगाब्लॉक आणि अशा अपघातांमुळे.. प्रवाशांचे अतोनात हाल होतात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close