S M L
  • नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद

    Published On: Apr 19, 2012 04:13 PM IST | Updated On: Apr 19, 2012 04:13 PM IST

    19 एप्रिलनाशिकमधल्या दिंडोरी तालुक्यात वणीजवळच्या मानदाने गावातल्या शेतात शेतकर्‍यांना सकाळी बिबट्या दिसला होता. याची बातमी अख्ख्या गावात पसरली आणि बिबट्याला बघायला नागरिकांनी गर्दी केली. या घटनेची बातमी वनविभागाला देण्यात आली. काही वेळातच पिंजरा आणि जाळीच्या साहाय्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिबट्याने दोन नागरिकांवर हल्ला केला. त्यात दोन जण गंभीर जखमी झाले. हे पाहून तेथे जमलेल्या नागरिकांनी बिबट्याला काठ्या आणि दगडाच्या साहाय्याने मारायला सुरवात केली. घाबरलेला बिबट्या झाडावर जाऊन बसला असता. या संधीचा फायदा घेऊन वनअधिकार्‍यांनी गुंगीचं औषध मारून बिबट्याला जेरबंद केले. आणि त्याला नाशिकच्या नेहरू उद्यानात आणण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close