S M L

द वॉल ढासळतोय

16 डिसेंबर भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ असलेल्या राहुल द्रविडला कौतुकानं द वॉल असं म्हटलं जायचं. पण सद्या ही वॉल ढासळतेय. लागोपाठच्या खराब फॉर्ममुळे द्रविडच्या क्रिकेट करियरवरचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.राहुल द्रविडसाठी 2008 हे वर्ष खराब गेलं. आपल्या फॉर्मशी झगडणा-या द्रविडला या वर्षी काही खास कामगिरी करता आली नाही. वर्षभरात त्याला 30च्या सरासरीनेही रन्स जमवता आले नाहीत. 2008 साली राहुल द्रविडनं 14 टेस्टमध्ये 669 रन्स केले.त्यात त्याची सरासरी होती ती फक्त 27.87 इतकी. या वर्षात द्रविडनं फक्त 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी केल्या आहेत. तर त्याचा सर्वात जास्त स्कोर होता तो 111 रन्सचा. वनडे टीममधून याआधीच राहुल द्रविड बाहेर फेकला गेला आहे. पण त्याला टेस्ट टीममध्येही आपली जागा टीकवण्यासाठी झगडावं लागणार आहे. दरम्यान फॉर्म हरवलेल्या राहुल द्रविडनं काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घ्यावी. आणि रणजी स्पर्धेत खेळाव. कारण त्याला आत्मविश्वासाची गरज आहे असं परखड मत क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2008 06:02 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2008 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close