S M L
  • एक अजब खारूताई

    Published On: Apr 27, 2012 02:11 PM IST | Updated On: Apr 27, 2012 02:11 PM IST

    27 एप्रिलसिंधुदुर्गातले उद्योजक राजन नाईक यांना कुडाळमध्ये एक अजब खारूताई आढळून आली आहे. खारीचं पिल्लू सर्वसामान्यांच्या आकर्षणाचं आणि प्राणीशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय ठरला ाहे. मुखडा उंदरासारखा, धड -शेपटी खारीची आणि रंग पांढरा. असं हे पिल्लू दीड महिन्यांपूर्वी नाईक यांना जखमी अवस्थेत आढळून आलं. पशुवैद्यकीय तज्ञांंना याबाबत नाईक यांनी विचारणा केली असता अशी कोणतीही खारीची जात अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे हे पिल्लू म्हणजे खारीत झालेल्या जनुकीय बदलांचा परीणाम असावा असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. प्राणी शास्त्रज्ञांच्या संशोधनाला आव्हान ठरलेलं हे पिल्लू निसर्गात सोडून दिल्यास जास्त दिवस जगू शकणार नाही असही नाईक यांना वाटतंय. त्यामुळे सध्यातरी या पिल्लाला नाईक यांच्या घरचाच पाहुणचार मिळतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close