S M L
  • आश्वासनं नको, पाणी द्या !

    Published On: Apr 28, 2012 05:23 PM IST | Updated On: Apr 28, 2012 05:23 PM IST

    28 एप्रिलकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज दुष्काळग्रस्त सातारा जिल्ह्याचा दौरा केला. सकाळी त्यांनी झाशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. आम्हाला आश्वासनं नको, पाणी पाहिजे, अशी एकच मागणी संतापलेल्या ग्रामस्थांनी राहुल गांधींकडे केली. अडीच तासात दौरा आटोपून राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले.'पाणी द्या पाणी..' ही आर्त हाक आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची... या तहानलेल्यांचे गार्‍हाणं ऐकण्यासाठी राहुल गांधी पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले. त्यांच्याआधी इंदिरा गांधी...राजीव गांधी आणि सोनिया गांधीही इथं येऊन गेल्या. गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसमोर या दुष्काळग्रस्तांची एकच कैफियत होती. आश्वासनं नको आम्हाला पाणी द्या.दारी आलेल्या राहुल गांधींकडून या ग्रामस्थांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यांच्या ओंझळीत पडली ती पाण्याची नुसती आश्वासनं. राहुल गांधींप्रमाणेच भाजपच्या विनोद तावडेंचाही या भागात दौरा सुरु आहे. काँग्रेसच्या युवराजांच्या या अडीच तासाच्या दौर्‍यावर त्यांनी टीका केली.आधी मुख्यमंत्री, नंतर शरद पवार आणि आता खुद्द राहुल गांधींनी या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. पाण्याचा थेंब नसला, तरी दौर्‍यांचा पाऊस मात्र धो धो कोसळतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close