S M L
  • कार्यकर्त्यांकडून 'टोल'फोड

    Published On: Apr 30, 2012 05:21 PM IST | Updated On: Apr 30, 2012 05:21 PM IST

    30 एप्रिलराष्ट्रवादीचे तासगाव विधानपरिषदेचे आमदार संजय पाटील यांना आज सकाळी 9 वाजता खेड शिवापूर टोल नाक्यावर कर्मचार्‍यांनी मारहाण केली. संजय पाटील यांना मारहाण प्रकरणी संतप्त झालेल्या पाटील यांच्या 150 ते 200 कार्यकर्त्यांनी दुपारी 3 च्या सुमाराला खेड शिवापूर टोल नाक्यावर हल्ला केला. आणि टोल नाका उध्दवस्त केला. यावेळी आयबीएन लोकमतचे पत्रकार सारंग शेट्ये दृश्य टिपत असताना कार्यकर्त्यांनी शेट्ये यांना मारहाण केली. आपल्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या कृत्याबद्दल संजय पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. या तोडफोड प्रकरणी 7 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तासगाव विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार संजय पाटील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास दुष्काळग्रस्त गावांच्या उपाययोजनेच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले. 9 च्या सुमारास खेड शिवापूर टोल नाक्यावर पाटलांची गाडी अडवण्यात आली. संजय पाटील यांनी आपले ओळखपत्र दाखवले मात्र टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांनी धुडकावून लावले. पाटील यांच्या गाडीत असलेल्या कार्यकर्त्यांनी कर्मचार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांत बाचाबाची होऊन कर्मचार्‍यांनी कार्यकर्त्याला मारहाण सुरु केली. आपल्या कार्यकर्त्याला मारहाण होताना पाहुन पाटील सोडवण्यासाठी धाव घेतली. पण संतापलेल्या कर्मचार्‍यांनी पाटील यांना मारहाण केली. या मारहाणीत पाटील यांच्या हाताला,पाठीला मार बसला. टोल नाक्यावर अनेक लोकांनी हा प्रकार पाहुन पाटील यांना बाजूला केले. पाटील यांनी याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. टोल नाक्यावर पाटील यांना मारहाणीची बातमी वार्‍यासारखी पसरली. तासगावात याचा निषेध करत गावकर्‍यांनी कडकडीत बंद पाळला. मात्र, संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी 3 च्या सुमाराला टोल नाक्यावर मोर्चा वळवला. जवळपास 150 ते 200 कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर हल्ला केला. टोल नाक्याची हातात येणारी प्रत्येक वस्तू कार्यकर्त्यांनी उध्वस्त केली. काही क्षणातच संपूर्ण टोल नाका उध्दवस्त झाला. टोल नाक्याच्या कर्मचार्‍यांनाही कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. या घटनेचे आयबीएन लोकमतचे पत्रकार सारंग शेट्ये दृश्य टिपत असताना संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांनाही मारहाण केली. त्यांचाकडील कॅमेरा हिसकावून घेऊन त्याची तोडफोड केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना हुसकावून लावले. तर सात कार्यकर्त्यांना मारहाण प्रकरणी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिसांनी दिले.पत्रकारांना मारहाणीबद्दल संजय पाटील यांनी केली दिलगिरी व्यक्तआयबीएन लोकमतच्या पत्रकार सारंग शेट्ये यांना झालेल्या मारहाणीबद्दल संजय पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिलगिरी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची केलेली तोडफोड आणि पत्रकारांनी केलेली मारहाणही अत्यंत निदंनिय आहे. कार्यकर्ते असं काही करतील याचा मला अंदाजा नव्हता. कार्यकर्त्यांनी तोडफोड करायला नको हवी होती. पत्रकारांना मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यांच्यावतीने मी माफी मागतो. तसेच कायदा हा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असं आश्वासन पाटील यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close