S M L
  • मी राजकारणी नाही, एक खेळाडू आहे - सचिन

    Published On: May 1, 2012 12:38 PM IST | Updated On: May 1, 2012 12:38 PM IST

    01 मे 2012खासदारकी मिळणं हा माझा सन्मान आहे. मी गेल्या 22 वर्षापासून क्रिकेट खेळत आलोय त्यामुळे मला ही खासदारकी देण्यात आली आहे. यापूर्वीही लता मंगशेकर आणि इतरांना हा सन्मान मिळाला. त्यांचानंतर मला हा सन्मान मिळाल्यामुळे मी आनंदी आहे असं मास्टर ब्लास्टर आणि खासदार सचिन तेंडुलकरने स्पष्ट केलं. तसेच मी राजकारणी नाही, एक खेळाडू आहे आणि नेहमी खेळाडूच राहीन. मी शेवटपर्यंत क्रिकेट खेळत राहणार असं मतही सचिनने स्पष्ट केलं. आज सचिनचा पुण्यात सन्मान करण्यात आला यावेळी सचिन बोलत होता.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता खासदार सचिन तेंडुलकर या नावाने ओळखला जाणार आहे. क्रिकेटमध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल सचिनला खासदारकी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. मात्र सचिन तेंडुलकर आणि राजकारणात जाणार ? यावरून मागिल आठवड्यात 'टी-20' सामना रंगला. सचिनच्या चाहत्यांनी तर सचिनने राजकारणात येऊच नये, तो क्रिकेटच्या मैदानावर चांगला असा सुर लगावला. तर अनेक दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त करत कुठे सचिनच्या निर्णायाचे स्वागत केले गेले तर कोणाला धक्के बसले. यात राजकारणाचा आखाडा तापणार नसेल तर नवलंच. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तर सरळ सरळ सचिनने काँग्रेसमध्ये यावं असं जाहीर आमंत्रण दिलं. मात्र मैदानावर सुरेख फटकेबाजी करणार सचिन आज पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत सगळ्या प्रश्नांना सीमा पार टोलावले. मी गेल्या 22 वर्षापासून क्रिकेट खेळत आलोय यामुळेच हा मला खासदारकी देण्यात आली. मला खासदरकी देण्यात आली माझा सन्मान आहे आणि याचा मला आनंद आहे. पण याचा असा अर्थ नाही की मी क्रिकेट सोडून राजकारणात जाणार, असं काही नाही. मी क्रिकेट खेळत राहणार क्रिकेट माझे आयुष्य आहे. आणि क्रिकेट माझं आयुष्य राहणारच असं स्पष्ट मत सचिनने व्यक्त केलं. तसेच दोन वर्षापूर्वी इंडियन एअरफोर्सने ग्रुप कॅप्टन करुन माझा गौरव केला होता. पण आजपर्यंत मला विमान उडवता येत नाही. त्यामुळे मला दिलेली खासदारकी हा खूप मोठा सन्मान आहे. यातून मला इतर खेळाडूंसाठी काही करत येईल. ते मी नक्की करेन मी राजकारणी नाही पण एक खेळाडू आहे त्यामुळे मला आपला सपोर्ट हवा आहे आणि मी आणखी एकदा सांगतो मी एक क्रिकेटर आहे आणि क्रिकेटरच राहणार असंही सचिन सांगितले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close