S M L
  • पाण्याच्या एका घोटासाठी...

    Published On: May 3, 2012 05:49 PM IST | Updated On: May 3, 2012 05:49 PM IST

    03 मेमराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु आहे. जनावरांनाही पाण्याअभावी जीव गमवावा लागतोय.राज्य दुष्काळात होरपळतंय... याला पवारांचा बारामती तालुकाही याला अपवाद नाहीय. इथंही भीषण पाणीटंचाई आहे. या परिसरात बांधलेल्या पाण्याच्या टाक्या आणि हातपंप निकामी झालेत तर विहिरी कोरडया पडल्या आहेत. जी परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात तीच मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. पाण्याच्या थेंबाथेंबासाठी लोकांना दूरवर पायपीट करावी लागतेय. प्राण्यांना पाण्याविना आपला जीव गमवावा लागतोय. पाण्याच्या आशेनं हे काळवीट मानवी वस्तीकडं निघालं. पण गावातल्या शिकारी कुत्र्यांनी चावा घेवून त्याला ठार केलं. राज्यातल्या दुष्काळाचं हे असं विदारक वास्तव आहे..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close