S M L

पुण्यात अ‍ॅलार्ड मॅनेजमेंट इस्टिट्यूटविरुद्ध विद्यार्थ्यांचं आंदोलन

17 डिसेंबर, पुणेअद्वैत मेहतापुण्यात विद्यार्थी संघटनांनी बेमुदत घेराव आंदोलन सुरू केलंय. हिंजवडीतल्या अ‍ॅलार्ड मॅनेजमेंट इस्टिट्यूटमधल्या पीजीडीएम कोर्सच्या 60 विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे. त्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. लाखो रूपये उकळून संस्थेनं दिशाभूल केल्याचा विद्यार्थांचा आरोप आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये एआयसीटी कडून PGDM अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट या कोर्सला 60 सीटसची परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र 120 विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन्स देण्यात आल्या. पहिली सेमिस्टर संपत आल्यावर निम्म्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की, प्रत्यक्षात त्यांना PGCM अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश देण्यात आला आहे आणि या कोर्सला महत्त्वच नाही."आम्हाला कोणत्या कोर्सला प्रवेश दिला जातोय, हे कधी स्पष्टपणे सांगितलंच नाही. आमच्याकडून दोन-दोन लाख रुपये फी म्हणून घेतले, वरून डोनेशनचेही पैसे घेतले. आता आम्ही काय करायचं ? आम्हाला न्याय हवाय" असं सौरभशेखर या विद्यार्थ्यानं सांगितलं.फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी मग विद्यार्थी संघटनांकडं धाव घेतली. विशेष म्हणजे राजकीय मतभेद विसरून सर्व संघटना एक झाल्या. विद्यार्थी आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी घोषणा देत संचालकांना घेराव घातला. "त्यांनी 7 दिवस मागून घेतले पण कुठलाही विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला नाही. मग आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असं सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी संचालकांना घेराव घातला.जोपर्यंत पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत कुठलाही कोर्स होऊ देणार नाही"असं महाराष्ट्र स्टेट यूथ काँग्रेसचे सेक्रेटरी निलेश बराटे यांनी स्पष्ट केलं.संस्थाचालकांनी गफलत झाल्याचं कबूल केलं. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी एआयसीटीकडे अ‍ॅप्रूव्हल मागितल्याचं स्पष्ट केलंय. "आम्ही 120 जागांसाठी परवानगी मागितली होती. पण आम्हाला फक्त 60 जागांसाठी परवानगी दिली. आम्ही या 60 जागाही कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण उशीरा लक्षात आलं की काही होत नाहीये" यासंस्थेत बहुतांश परप्रांतीय विद्यार्थी आहेत.त्यांनी शैक्षणिक कर्ज पण काढली आहेत.या गैरकारभारामुळं त्यांची आर्थिक फसवणूक तर झालीच आहे.तसंच शैक्षणिक करियरही धोक्यात आलंय. आता कदाचित संस्थाचालकांवर कारवाई होईल. कदाचित विद्यार्थ्यांना त्यांच्या फीचे पैसेही मिळतील. पण त्यांच्या वाया गेलेल्या वेळेचं काय ? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. आता तरीविद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या अशा मुजोर संस्थाचालकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 09:19 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close