S M L
  • आजची गाणी रटाळ,भाव विरहित - आशा भोसले

    Published On: May 14, 2012 12:06 PM IST | Updated On: May 14, 2012 12:06 PM IST

    15 मेआत्ताची गाणी रटाळ आणि भाव विरहित आहेत, तरीपण ते लोकांनी स्विकारली त्यामुळे संगीताच्या खडतर प्रवासाला लोकच जबाबदार असल्याची टीका सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी केली. लता मंगेशकर मेडीकल फॉडेशनच्या नव्या रुग्णालया उद्घटना प्रसंगी आशाताई बोलत होत्या. पुण्यातील वारजे भागात माई मंगेशकर या नव्या अत्याधुनिक रुग्णालयाच उद्घाटन पंडित हृदयनाथ मंगेशकर व आशाताईंच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी माध्यमांशी बोलताना आशाताईंनी सध्याच्या संगीत क्षेत्रावर कडाडून टीका केली. आज कोणतही मुन्नी येते आणि झेंडू बॉमवर नाचून जाते. संगीत ही आराधना आहे. कोणी कसाही स्वर लावतोय. हिंदीत इंग्लिश,पंजाबी अशा आणि वेगळ्या भाषेना विनाकारण मिक्स केले जाते त्यामुळे संगीत आज श्रवणीय राहिलेच नाही अशी खंत आशाताईंनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close