S M L
  • सनाने, जग जिंकून दाखवले !

    Published On: May 23, 2012 12:19 PM IST | Updated On: May 23, 2012 12:19 PM IST

    भगवान पाटील, मालेगाव23 मेआपल्या हुशारीची किंमत एखाद्याला किती टोकाची द्यावी लागते याचा जहरी अनुभव मालेगावच्या सना अन्सारी या मुलीनं घेतला होता. 10 महिन्यांपूर्वी ऍसिड पाजल्याने जखमी झालेली सना आता पूर्ण बरी झाली आहे. इतकंच नाही तर विशेष म्हणजे आज तिचं लग्न होतंय. सनाच्या या आगळ्यावेगळ्या कहाणीबद्दल...मेंदीच्या रंगानं बहरून गेलेले मालेगावच्या सना अन्सारीचे हात... 10 महिन्यांपूर्वी, गेल्या 10 जूनला हेच हात असहाय झाले होते. हुशार मुलगी म्हणून मत्सरापोटी मदरशाच्या रेक्टरनं सनाला जबरदस्तीनं ऍसिड पाजलं होतं. स्वरयंत्र, अन्ननलिका, श्वासनलिका, जठर जळालेली सना त्यानंतर कित्येक महिने काळाशी झुंजत होती. आधी नाशिक मग मुंबई.. आयबीएन-लोकमतनं तिची व्यथा मांडली. सनाच्या मदतीला अनेक हात धावून आले. त्या सार्‍यावर मात करून सना तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करतेय.. मालेगावच्याच मोहम्मद सुलतान या तरुणासोबत ती नवीन आयुष्य सुरू करतेय. घरच्या गरिबीवर मात करून धर्मशास्त्राची पदवी घेणारी सना..ज्या रेक्टरनं संरक्षण द्यायचं तिनंच मत्सरापोटी घात केलेली सना..ज्या स्वरयंत्रातून धर्मपठण करायचं त्याची ऍसीडनं वाताहत झालेली सना..आणि आज या सार्‍यावर मात करून पुन्हा नव्यानं उभी राहाणारी सना..या वळणावर आयबीएन लोकमतच्या सनासाठी लाख लाख शुभेच्छा..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close