S M L
  • कोलकात्यात 'रावडी रायडर्स'ची भव्य मिरवणूक

    Published On: May 29, 2012 10:43 AM IST | Updated On: May 29, 2012 10:43 AM IST

    29 मेकोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएलच्या पाचव्या हंगामाचं जेतेपद पटकावलंय आणि त्यानंतर सध्या पश्चिम बंगालमध्ये विजयोत्सव सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून विजयी खेळाडूंची मिरवणूक काढली गेली. या मिरवणुकीचा शेवट हा ईडन गार्डन्सवर झाला. यानंतर ईडन गार्डन्सवर एक भव्य सत्कार सोहळा पार पडतोय. मालक शाहरुख खानबरोबर कोलकात्याची संपूर्ण टीम या विजयोत्सवात सामील झाली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सची टीम त्यांच्या करबो लोडबो जीतबो रे..या स्लोगन नुसारचं खेळली. आणि विजेते पदाची हॅट्रिक साधण्याचं चेन्नईच्या सुपर किग्जचं स्वप्न उद्धस्थ करताना त्यांनी पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. गौतम गंभीरची कॅप्टनसी, मनविंदर बिस्लाच्या 89 धाावा आणि जॅक कॅलिसची अष्टपैलू चमक यामुळे कोलकाताचं विजयाचं स्वप्न साकार झालं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close