S M L
  • शुक्राचे सुर्यावर अधिक्रमण

    Published On: Jun 6, 2012 11:45 AM IST | Updated On: Jun 6, 2012 11:45 AM IST

    06 जूनखगोलप्रेमींसाठी आजचा दिवस मोठा पर्वणीचा होता. शुक्राच्या अधिक्रमणाचा आनंद आज खगोलप्रेमींना लुटता आला. शुक्राचे पृथ्वी आणि सुर्याच्या मधून अधिक्रमणाचा अनोखा सोहळा आज पहायला मिळाला. पृथ्वी आणि सुर्याच्या मधून जाताना तो लहान आणि अतिशय गडद रंगाच्या ठिपक्याप्रमाणे दिसला. शुक्राचे संक्रमण ही आपल्या डोळ्यादेखत घडणारी अतिशय दुर्मिळ अशी घटना आहे. मात्र पुण्या-मुंबईत खगोलप्रेमींची जरा निराशा झाली. ढगाळ वातावरणामुळे शुक्रअधिक्रमणाचा आंनद पुण्या-मुंबईतल्या खगोलप्रेमिना घेता आला नाही. आता सुमारे शंभर वर्षानंतर म्हणजेच 2117 मध्ये आता असा योग जुळून येईल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close