S M L
  • ठाण्यात अनधिकृत पक्ष कार्यालयावर हातोडा

    Published On: Jun 7, 2012 12:07 PM IST | Updated On: Jun 7, 2012 12:07 PM IST

    07 जूनठाण्यातील अनाधिकृत पक्ष कार्यालयावर हातोडा मारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. ठाणे पूर्वेकडील सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयात पालिकेच्या पथकानं कारवाई सुरु असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार केला. या लाठीचार्जमुळे या परिसरात तणावाचं वातावरण पसरलंय. कार्यकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्यात एक कॉन्सटेबल किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.होमहवन करुन कारवाई रोखण्याचा प्रयत्न कोपरीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर कारवाई सुरु असताना झालेल्या दगडफेकीनंतर अधिकार्‍यांना जेव्हा आपला मोर्चा गांधी नगरकडे वळवला. तेव्हा तिथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या नेत्यांची युती दिसून आली. गांधीनगरमधल्या शिवसेना आणि काँग्रेस कार्यालयावर कारवाई होण्याची चिन्ह दिसताच ठाण्यातील सेनेचे आमदार आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर आणि गटनेते रविंद्र फाटक हे सेनेच्या पदाधिकार्‍यांबरोबर पालिका अधिकार्‍याशी वाद घालताना दिसले. या वेळी काँग्रेसच्या कार्यालयात चक्क होमहवन करुन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close