S M L
  • गडचिरोलीत गिधाडांसाठी खास उपहारगृह

    Published On: Jun 7, 2012 04:06 PM IST | Updated On: Jun 7, 2012 04:06 PM IST

    07 जूननिसर्गाचे सफाई कामगार अशी ओळख असलेली गिधाडं जगवण्यासाठी आता गडचिरोली वनविभागाने उपहारगृहातील खास मेनू गिधांडांना देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. अलिकडच्या काळात जनावरांना देण्यात येणार्‍या रसायनयुक्त आहारामुळे जनावरांचं मांसही विषारी होऊ लागलं आहे. त्यामुळे गिधाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच गिधाडांची घटती संख्या पहाता वनविभागाने माडेतुकुम आणि मारकबोडी गावालगत दोन उपहारगृह उभारली आहेत. या गिधाडांसाठी जनावरांचं मृत मांसच दिलं जाणार आहे. आणि यासाठी वनविभागाने गावकर्‍यांचीच मदत घेतली आहे. मेलेली जनावर आणून देणार्‍या गावकर्‍यांना प्रत्येकी 250 रुपये दिले जाणार आहेत. तशी पत्रकही गावांमध्ये वाटण्यात आली आहेत. त्यामुळे पाच महिन्यांपूर्वी गिधाडांची संख्या 30 ते 35 होती ती आता 75 ते 80 झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close