S M L
  • 35 वर्षांनंतर मंदिर आले पाण्याबाहेर

    Published On: Jun 9, 2012 05:12 PM IST | Updated On: Jun 9, 2012 05:12 PM IST

    08 जूनराज्यात दुष्काळामुळे 11 जिल्ह्यांची दैनावस्था निर्माण केली असली तरी इंदापूर तालुक्यातल्या उजनी धरण परिसरात मात्र सध्या आनंदाचं वातावरण आहे. या धरणातील पळसनाथाचं मंदिर हे तब्बल 35 वर्षांनंतर पाण्याबाहेर आलं आहे. 1976 साली उजनी धरणात गेलेल्या पलसदेव गावातील 4 प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली . यापैकी पळसनाथ आणि हेमाडपंती मंदिर पाण्याबाहेर आल्याने ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. यातलं हेमाडपंथी मंदिर हे अतिशय सुंदर आहे. या मंदिरावर , नागकन्या, केतकीबारण, दालमालिनी, मदनिका, स्वरसुंद्री, सेतू बांधणारे हनुमान आणि वानर अशी अप्रतिम कलाकुसर दिसत आहे. 35 वर्षांनंतर मंदिरबाहेर आल्यामुळे नागरिकांनी मंदिरात एकच गर्दी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close