S M L
  • तब्बल 300 पोती नोटांचा चुरा

    Published On: Jun 12, 2012 03:29 PM IST | Updated On: Jun 12, 2012 03:29 PM IST

    12 जूनखाण घोटाळ्यामुळे बदनाम असलेल्या कर्नाटकातल्या बेल्लारीमध्ये धक्कादायक बाब उघड झाली. इथल्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये नोटांचा चुरा सापडला आहे. तब्बल 300 पोत्यांमध्ये नोटांचा चुरा भरला होता. पण याबद्दल काहीच कल्पना नसल्याचं फॅक्टरीच्या मालकाचं म्हणणं आहे. प्लायवूड बनवण्यासाठी इंदूरहून माल आणल्याचं त्याचं म्हणणं आहे. पण नेमका या नोटांचा चुरा का करण्यात आला ? आणि या फॅक्टरीत कोणी ठेवला याचा तपास पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close