S M L
  • माऊलींच्या पालखीने पार केला दिवेघाट

    Published On: Jun 15, 2012 04:27 PM IST | Updated On: Jun 15, 2012 04:27 PM IST

    15 जूनमाऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी पुण्यातला दोन दिवसांचा मुक्काम आटोपून आज पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं. माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली. माऊलींची पालखीने आज अवघड दिवेघाटाची चढण पार केली. घाटातून पालखी जाताना वारकर्‍यांच्या उत्साहाला एकच उधाण आलं. हा सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच वारकरी पूर्ण दिवेघाटात जागा धरून होते. दुपारी 3 ते 4 च्या सुमारास माऊलींची पालखी दिवेघाटात दाखल झाली. त्याआधी पायथ्याशी माऊलींच्या रथाला बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. टाळ,मृदुंगाच्या जयघोषात पालखीनं दिवेघाट पार केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close